जिल्हातील राज्य व प्रमुख मार्गांसाठी १९ कोटींचा निधी; पालकमंत्र्यांची माहिती

0
40

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राज्य व प्रमुख मार्गासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्ह्यातील ज्या प्रमुख मार्गांसाठी हा निधी दिला आहे त्यामध्ये दिंडनेर्ली गावाजवळ चॅनेल गटर्स व सी.डी. वर्क बांधकामासाठी ६० लाख रुपये, गगनबावडा तालुक्यातील शेणवडे-चौगुलेवाडी येथील सरीता मापन केंद्रा जवळील चढ काढण्यासाठी एक कोटी रुपये, गगनबावडा तालुक्यातील साळवण येथील पडवळ मळ्याजवळील चढ काढण्यासाठी ७५ लाख, मणदूर येथे लहान पूल बांधण्यासाठी ५० लाख, साखरी, म्हाळुंगे गावाजवळील चढ काढण्यासाठी ७० लाख, धुंदवडे ते जरगी रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी ७० लाख, पन्हाळा तालुक्यातील ज्योतिबा येथील गायमुख बाह्यवळण शेजारील रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी ५ कोटी रुपये, ज्योतिबा येथील गायमुख बाह्यवळण संरक्षण भिंत बांधणे व रस्त्यांची रुंदीकरणास सुधारणा करण्यासाठी  ७५  लाख रुपये असा एकूण १९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here