डी. वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हरच्युअल क्लासरूमची सुरूवात

0
68

कोल्हापूर (प्रतिनिधी): सध्या जगभऱ देशात व महाराष्ट्रात कोरोना (कोविड- १९) या संसंर्गजन्य या रोगाणे थैमान घातलेले असून या संदर्भात कठोर पावले उचलताना गर्दीच्या ठिकाणी एकत्र न येण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काळजी घेण्याचे आवाहान करत कोल्हापूर जिल्हातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा व महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. पण प्राध्यापक तसेच इतर कर्मचारी नेहमीप्रमाणे संस्थेमध्ये हजर राहत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून या परिस्थितीवर उपाय योजना म्हणून साळोखेनगर मधील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजने साळोखेनगरमध्ये अत्याधुनिक *व्हरच्युअल क्लासरूमची सुरूवात केली आहे.

व्हरच्युअल क्लासरूम या तंत्रज्ञानाचा उपयोग करून डी. वाय. पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक गुगल क्लास रूम, क्लाऊड कॉम्प्यूटींग, एक्स रेकॉर्डऱ ,मुडल तसेच व्हॉटस्‌ ॲप फेसबुक व युटूब या माध्यामांचा वापर करत आहेत. याद्‌वारे त्यांचे नियमित अध्यापन सुरू ठेवले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे घरबसल्या निरसन होत असून क्लासमध्ये न बोलनारे विद्यार्थीं सोशल मिडीयाच्या व्यासपीठावर व्हरच्युअल क्लासरूमच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.तसेच क्लाऊड कॉम्पुटिंग माध्यमातून असाइंनमेंट सुद्धा घरबसल्या पूर्ण करत आहेत.तसेच विध्यार्थ्यांनची उपस्थिती सुद्धा ऑनलाइन पध्दतीने घेण्यात येत असून एखादा मुद्दा न कळल्यास पुन्हा सांगून शंकेचे निरसन करणयात येत आहे.पारंपारिक कलासरूम पेक्षा नाविन्यपूर्ण उपक्रम असल्यामुळे पहिलाच दिवशी विध्यार्थ्यांनचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.”गरज ही शोधाची जननी आहे” हे ओळकुन साळोखेनगर मधील डी वाय पाटील इंजिनीरिंग कॉलेज ने सुरू केलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून बाकीच्या महाविद्यालयाने सुद्धा याचे अनुकरण करावे. असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.पी.कल्लीमनी व उपप्राचार्य डॉ.अभिजीत माने यांनी आवाहन केले. या वेळी या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय पाटील , उपाध्यक्ष श्री.सतेज पाटील, विश्वस्त सौ. प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here