पंकजा मुंडे यांची आज कोल्हापुरात सभा

कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची मिरजकर तिकटी येथे येथे आज बुधवारी (6 एप्रिल) प्रचारसभा होणार आहे.

 कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रमुख पक्षांचा प्रचार वेगात सुरु आहे. सध्या सत्तेवर असलेली महाविकास आघाडी आणि विरोधी भारतीय जनता पक्ष यांच्या दृष्टीने ही निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची बनलेली आहे. पक्षाच्या राज्य पातळीवरील वलयांकित नेत्यांचा मतदारांना आकर्षित करण्यासाठी उपयोग करुन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही पक्ष आपापल्या पक्षातील नेत्यांच्या प्रतिमेचा आणि लोकप्रियतेचा प्रचारासाठी वापर करत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची कोल्हापूर येथे आज बुधवारी (6 एप्रिल) सभा होत आहे. भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी सायंकाळी सात वाजता मिरजकर तिकटी येथे मुंडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे.