महापौर कुस्ती चषक स्पर्धेवर कोरोनाचे सावट; स्पर्धा स्थगित

0
23

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाढत्या कोरोना वायरसच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांच्या निर्देशांनुसार १९ ते २२ मार्च दरम्यान राजर्षि शाहू खासबाग कुस्ती मैदानात होणाऱ्या महापौर चषक कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात आल्याची माहिती महापौर निलोफर आजरेकर व राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी पाटील यांनी आज (मंगळवारी) संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत दिली.

राज्याच्या मुख्य सचिवांनी गुरुवारी दि.५ रोजी कोरोना वायरस प्रतिबंधात्मक उपाय योजनेसंबंधी व्हिडिओ कॉनफरन्स घेऊन राज्यातील यात्रा,समारंभ, उत्सव आदी मोठे जनसमुदाय एकत्रित आणणाऱ्या कार्यक्रमांना प्रतिबंध अथवा नियंत्रण करावे याकरता सर्व महापालिका व नगरपालिकांनी परावृत्त करावे.जनजागृती करण्यासाठी होल्डिंग,फलक,सार्वजनिक रुग्णालय सज्ज ठेवावी असे सूचना दिल्या आहेत. त्याची अंलबजावणी म्हणून येत्या १९ ते २२ मार्च दरम्यान खासबाग कुस्ती मैदानात घेण्यात येणाऱ्या महापौर चषक कुस्ती स्पर्धा स्थगित करण्याच्या निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धा नियमित वेळेनुसार होणार आहे. यात करून व्हायरसची कोणतीही अडचण येणार नाही यासाठी महापालिका प्रशासन योग्य खबरदारी व जनजागृती करत असल्याचे महापौर आजरेकर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here