कोरोना व्हायरसचा चीनमधील लॅबने केला फोटो शेअर !!

0
105

नवी दिल्ली: दक्षिण चीनमधील एका लॅबमध्ये कोरोनाव्हायरसचा शोध तंत्रज्ञानाच्या मदतीने लावण्यात आला आहे. यासाठी गेला महिनाभर चीनमधील शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते. शास्त्रज्ञांनी हा विषाणू जिवंत असताना त्याची स्थिती दर्शविण्यासाठी जैविक नमुना चाचणी केली, त्यानंतर त्याचा शोध लागला. प्रमुख शास्त्रज्ञ लियू चुआंग यांनी याबाबत डेली मेलला दिलेल्या माहितीत, “या विषाणूचे स्वरूप अगदी त्याच्या स्वभावासारखेच आहे. हा विषाणू वेगाने पसरतो. त्यामुळं आता त्यावर उपाय कसे करायचे याचा शोध आम्ही घेणार आहोत” असे सांगितले. एकीकडे चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी, इटली आणि इरानमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. तर, न्यूयॉर्कमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 44 वरून 89वर पोहचली आहे. कोरोनामुळं फक्त जगाची अर्थव्यवस्थाच नाही तर अनेक कार्यक्रमही रद्द होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here