ऑनलाइन फूड डिलिव्हरी बाजारात बेजोस-नारायणमूर्ती एकत्र उतरण्याच्या तयारीत !

0
39

मुंबई – देशात ऑनलाइन फूड डिलिव्हरी व्यवसायात दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझाॅनचे जेफ बेजोस व इन्फोसिसचे के. नारायणमूर्ती पुढील महिन्यापासून संयुक्तपणे ऑनलाइन फूड डिलिव्हरी बाजारात उतरण्याच्या तयारीत आहेत. अॅमेझाॅन प्राइम अथवा अॅमेझाॅन फ्रेश प्लॅटफॉर्मद्वारे लाँच होणाऱ्या या प्रकल्पाची बंगळुरूत चाचणी सुरू आहे.

अॅमेझाॅनची स्पर्धा स्विगी व झोमॅटोशी असेल. बाजारात याच्या २ मोठ्या कंपन्या आहेत. उबेरने गेल्या महिन्यात त्यांचा व्यवसाय झोमॅटोला विकला. यानंतर झोमॅटोचा बाजारातील हिस्सा ५५% झाला होता. उत्पन्नाच्या बाबतीत स्विगीचा मार्केट शेअर ६०%च्या आसपास आहे. आधीच स्विगी व झोमॅटोने डिस्काउंट घटवला आहे.

यामुळे आक्रमक मार्केटिंगसह अॅमेझाॅन या व्यवसायात प्रवेश करत आहे. बंगळरूच्या रेस्तराँच्या संचालकाच्या मते, प्रीवन बिझनेस सर्व्हिस अॅमेझाॅनवर लिस्ट करण्यासाठी ब्रँड्ससह करार करत आहेत. ते १० ते १५% कमिशनची ऑफर देत आहेत. मात्र, या बदलास वाव ठेवण्यात आला आहे. प्रीव्हन बिझनेस सर्व्हिस इन्फोसिसचे नारायणमूर्ती यांचा कॅटमरन व्हेंचर व अमेझान इंडियाचा संयुक्त उपक्रम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here