उद्योजक संजय घोडावत यांच्या वाढदिवसाला अभिनेते रितेश देशमुख यांची उपस्थिती…!

0
48

कोल्हापूर (प्रतीनिधी): प्रसिद्ध उद्योजक व संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांचा ५५ वा वाढदिवस गुरुवारी (दि.२७) रोजी सकाळी १०.३० वाजता संजय घोडावत विद्यापीठ,अतिग्रे येथे साजरा होणार आहे. उद्योजक घोडावत यांचा वाढदिवस व एसजीयुच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त दरवर्षी प्रसिद्ध अभिनेता व अभिनेत्री यांना निमंत्रित केले जाते. यावर्षी वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिनेअभिनेते रितेश देशमुख यांची उपस्थिती असणार आहे. अशी माहिती विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी दिली.

याच दिवशी घोडावत विद्यापीठाच्या ‘उमंग’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचेही उद्घाटन रितेश देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी रितेश देशमुख हे चाहत्यांशी संवाद साधणार आहेत. संजय घोडावत हे दरवर्षी आपल्या वाढदिवसाला हार, बुके न स्वीकारता वह्या, पुस्तके स्वीकारून जिल्हातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करतात.शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळग्रस्त शेतकरी आणि इतर अनेक सामाजिक कार्यांसाठी त्यांनी उदार भावनेने मदत केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here