आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर…!

0
30

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण उद्या (शनिवारी) संसदेत आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज सीतारमण यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षाचे आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत सादर केले आहे. या सर्वेक्षणात २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ६  ते ६.५ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सीतारमण यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणानुसार चालू वर्षात आर्थिक विकासदर ५  टक्के राहू शकतो. त्यामुळे विकासदर वाढवण्यासाठी सरकारची तिजोरी रिकामी करावी लागेल. आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे की, नवे व्यवसाय सुरु करण्यासाठी, मालमत्तेच्या नोंदणीसाठी, कर भरणे, कराराची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी नवे उपाय योजण्याची आवश्यकता आहे.

दरम्यान, 2020-21 चा अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा अखेरचा ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. अनेक राज्यांमधील नेत्यांची केंद्रात बढती करण्याची भाजपची तयारी आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अर्थमंत्रीपदी नवीन व्यक्ती नेमण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा यंदाचा अर्थसंकल्प परीक्षेचा ठरु शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here