जिल्हा परिषदेत कारभाऱ्याची दादागिरी;सर्वत्र संताप,भाजप आक्रमक

0
242

कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या दालनात मंगळवारी एका महिला अधिकाऱ्यास काँग्रेसच्या एका कारभारी व महिला सदस्याच्या पतीने शिवराळ भाषेत केलेल्या अपमानास्पद वागणूकीचे जिल्हा परिषद क्षेत्रात वादग्रस्त पडसाद उमटले आहेत. विरोधी भाजपचे पक्षप्रतोद विजय भोजे यांनी या घटनेचा निषेध करीत या कारभाऱ्याकडून अशी घटना घडू नये अशी समज पत्रकाद्वारे दिली आहे.

सत्तारुढ गटामधूनही या कृतीबाबत नाराजी व्यक्त करीत नेत्यांनी कारभाराच्या बेलगाम वागण्यावर लगाम घालावी असे मत व्यक्त केले आहे. या कारभाऱ्याची एम.डी म्हणून नियुक्ती केली आहे काय असेही भोजे यांनी पत्रकात म्हटले आहे. या कारभाऱ्याने पदाधिकारी असताना एका कर्मचाऱ्यास शिवीगाळ केली होती. त्यावेळी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून निषेध केला होता. त्याकाळातच योजनांच्या तपासणीच्या नावाखाली ग्रामस्तरावरील कर्मचाऱ्याकडून ‘ढपला’ पाडल्याची चर्चा आहे.त्याच्या बेलगाम कृत्यावर पायबंद घालावा अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. या महिला अधिकाऱ्यांचे काम चांगले आहे म्हणूनच सन्मान झाला आहे. त्यांना राजकीय वारसा आहे. कामकाजाबद्दल सर्व समाधान असताना या कारभाऱ्याच्या पोटात का दुखावे अशीही चर्चा सुरु झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here