थुंकी मुक्त कोल्हापूर चळवळीची गाडगेबाबांना अनोखी आदरांजली

कोल्हापूर: थुंकीचंद गो बॅक, ही शाहूनगरी करायचीआहे स्वच्छ आणि निरोगी, पाहूण हे कोल्हापूर हाय, इथ थुंकलेल चालत नाय, अशा समाज प्रबोधन पर घोषणा देत चळवळी तर्फे समाजसुधारक संत गाडगेबाबांना आदरांजली वाहण्यात आली .23 फेब्रुवारी या गाडगेबाबा जयंतीच्या औचित्याने ज्योतिबा रोडवरील संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यासमोर जमून चळवळीच्या कार्यकर्त्यांनी थुंकीमुक्तीच्या घोषणा दिल्या.

तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी शपथ घेतली. स्वच्छ निरोगी कोल्हापूरसाठीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ज्योतिबा रोड ,महाद्वार रोड परिसरातील विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी स्टिकर्स चिकटवण्यात आले . रिक्षाचालक, महालक्ष्मी दर्शनासाठी आलेले भाविक दुकानदार व पादचारी यांच्यामध्ये जनजागृती करण्यात येत होती. तसेच थुंकणारी व्यक्ती आढळल्यास तिचे प्रबोधन करून सार्वजनिक स्वच्छता करण्यास भाग पाडले जात होते.

नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला प्रशासनाने कठोर कारवाई करावी असे अशी मते नागरिकांकडून व्यक्त केली जात होती.

या उपक्रमाचे संयोजन विजय धर्माधिकारी,राहुल राजशेखर, दीपा शिपूरकर यांनी केले.तर थुंकीमुक्त चळवळीच्या सारिका बकरे ,महेश ढवळे, विद्याधर सोहोनी, अनिल कांझर, फिरोज शेख, मोहन सातपुते, अभिजित रोटे ,विनायक देसाई, सुजाता पाटील ऐश्वर्या मुनीश्वर, प्रकाश पाटील, अजय कुरणे सचिन वारके, सागर परीट ,युवराज पाटील तसेच अँटी स्पिटिंग मूव्हमेंट चे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.