मुलाच्या बाराव्या दिवशी जि.प.शाळेला दिले ग्रंथालय

0
105

भेडसगाव/मारुती फाळके:
शाहूवाडी तालुक्यात दुर्गम भागात वसलेले कांटे गाव. शेतीवर पोट भरणारा शेतकरी वर्ग; त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच . सामाजिक शैक्षणिक जागृती फारशी नसलेल्या या गावातील एक गरीब कुटुंब म्हणजे भगवान तेलवणकर.काबाडकष्ट करून सारा संसार सुखाचा चालला होता.काटे सारख्या दुर्गम गावातून मलकापूर किंवा नजीकच्या बाजारपेठेत ये जा करण्यासाठी मुलाच्या हट्टापायी दुचाकी घेतली त्यांचा मोठा मुलगा अजय तेलवणकर* हाच गाडी चालवायचा , वय वर्ष २४ ,आणि काय विपरीत घडलं,काळाची नजर लागली ,५ जानेवारीला दुचाकी चा अपघात झाला.घरच्यांनी अजयला वाचवण्याचे अथक प्रयत्न केले, पण यश आले नाही,दि.८ जानेवारी वाढदिवसाच्याच दिवशी उपचारादरम्यान तो सर्वांना सोडून गेला.नियतीने आपला डाव साधला, वयाच्या २४ वर्षापर्यंत ज्या हातांनी पोटच्या पोराला वाढवलं त्या हाताने अग्नी देताना बापाच्या हृदयाची काय घालमेल झाली असेल हे स्मशानभूतीत त्यादिवशी पहायला मिळालं.
गरिबीने पीचलेल्या वेलणकरा च्या कुटुंबात काळाने घाला घातला आणि नियतीने घाला घातलेल्या दुःखात होरपळणाऱ्या, गुऱ्हाळघरात काम करणाऱ्या या गरीब कुटुंबातील अशिक्षित वडिलांना व कुटुंबियांना खरोखरच पोरकं केलं, वेलणकर यांच्या संस्कार आणि संस्कृती जोपासण्याच्या विचारांना सॅल्युट करावं तितकं कमीच.
खरंतर पारंपारिक रूढीनुसार मृत व्यक्तीच्या बाराव्या दिवशी येणाऱ्या नातेवाईकांना भांडी वाटप केलं जातं.
पण या निरक्षर पालकांनी व अजयच्या मित्रमंडळींनी एक वैचारिक, विधायक सुरुवात म्हणून शाळेकडे विचारणा केली.. व यातून निर्माण झाले कै.अजय भगवान तेलवणकर ग्रंथालय व साठी साडे चार हजाराचे लाकडी कपाट व दीड हजाराची पुस्तके दिली. ज्या शाळेत अजय शिकला त्या शाळेत अजयच्या नावाचा ग्रंथालय त्याची नेहमीच आठवण करून देईल. सामाजिक रूढीला छेद देऊन शैक्षणिक, सामाजिक कार्य करणाऱ्या या निरक्षर पालकांच्या वैचारिक जागृतीला मनापासून सलाम!आधुनिकतेच्या या जमान्यात माणसा माणसातील संवाद कमी होत असलेल्या आजच्या वातावरणात भगवान वेलणकर यांच्या या वाचन आणि वाचनसंस्कृती जोपासण्याचा विचारांना सलाम करावा इतकं हे वैचारिक कार्य निश्चितच समाजाला दिशादर्शक,अनुकरणशील आणि प्रेरणादायी आहे.वेलणकर यांच्या या उपक्रमामुळे ज्ञानशिदोरीचा जागर समाजमनातून होण्यास निश्चित मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here