शिक्षक बँक निवडणूक राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या झेंड्याखालीच लढवणार-संघटनेच्या बैठकीत निर्धार

0
121

कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  प्राथमिक शिक्षक बँकेची आगामी निवडणूक महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या झेंड्याखालीच लढवण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. शिक्षक बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला.

सध्या या बँकेवर प्राथमिक संघाच्या वरुटे गटाची एकहाती सत्ता आहे. या पार्श्वभूमीवर बँकेच्या निवडणुकीत सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.

यावेळी संघटनेचे विभाग संघटक श्रीनाथ पाटील, जिल्हा सरचिटणीस तुषार पाटील, कार्याध्यक्ष राहुल कांबळे, कोषाध्यक्ष निलेश कारंडे, सह सचिव रणजित जठार, बंडा कांबळे, मारुती फाळके,संदीप कांबळे, राहुल जाधव, प्रमोद पाटील, तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, विजय रामाने, आनंद पाटील, बाजीराव पाटील,शिवतेज बाजारी, रामेश्वर विभुते, निलेश गावडे बाजीराव पाटील,यासह तालुका,जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here