शिवाजी विद्यापीठात पार पडणार “असमानता आणि दारिद्र्य” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने ‘असमानता आणि दारिद्र्य’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या मंगळवारी (दि.१५ फेब्रुवारी) सायकांळी ४ वाजता ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. जगन कराडे आणि डॉ. राजेंद्र पाटील यांनी संपादित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास भारती विद्यापीठ तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. उत्तमराव भोईटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी असतील.प्रकाशन सोहळ्यानंतर पुस्तकावर चर्चा होणार असून त्यात राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मान्यवर सहभागी होणार आहेत. यामध्ये डॉ. विद्युत जोशी (गुजरात), डॉ. आर. इंदिरा (कर्नाटक), डॉ. आनंद कुमार (गोवा), डॉ. वेन्केटेश्वरलु (आंध्रप्रदेश), डॉ. एस. गुरुस्वामी (तमिळनाडू), डॉ. अरविंदर अन्सारी (नवी दिल्ली), डॉ. बिस्वजीत घोष (पश्चिम बंगाल), डॉ. नागराजू गुंडेमेडा (हैदराबाद) यांचा समावेश आहे. हा ग्रंथ रावत पब्लिकेशन या प्रतिष्ठित प्रकाशन कंपनीमार्फत प्रकाशित होतो आहे.