सोनल पाटीलला मिस गोखलेचा किताब…!

0
202

कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात श्रीमती सुशिलादेवी म.देसाई युवती सचेतना फौंडेशन आणि दौलत देसाई मित्र परीवाराच्या वतीने झालेल्या मीस गोखले स्पर्धेत सोनल पाटील हिने मिस गोखले चा मानाचा किताब मिळवला. या स्पर्धेत आकांक्षा जाधव हिला बेस्ट स्माईल, ऐश्वर्या साळोखे  बेस्ट हेअर, कोमल खांडेकर बेस्ट कॉन्फिडन्स आणि सुजान नदाफ हिने बेस्ट फोटोजनिक चा किताब मिळवला. मृणाल गायकवाडने फस्ट रनर, साक्षी गायकवाडने सेकण्ड रनरचा किताब प्राप्त केला.

या स्पर्धेचे उद्घाटन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, सौ.ग्रीष्मा महाडिक,सौ.गायत्री कुपेकर आणि प्रा.डॉ.मंजिरी मोरे- देसाई यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले. या स्पर्धेत २२ स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. स्मिता खामकर, प्रा.डॉ. मंजिरी मोरे-देसाई, सई पंडित यांनी काम पाहिले. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रा.डॉ.मंजिरी मोरे-देसाई, सौ. स्मिता खामकर, सौंदर्य विशेषज्ञ अनुराधा पित्रे यांच्या हस्ते मिस गोखले मानाचा किताब, मुकुट, पुष्पगुच्छ,स्मृतिचिन्ह आणि सावित्रीबाई फुलेंची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर जयकुमार देसाई, युवानेते दौलत देसाई, परिवहन समितीचे माजी सभापती अजित मोरे, प्रा.डॉ.पी.के.पाटील, उपप्राचार्य एस.एच.पिसाळ,पर्यवेक्षक एस.एन.मोरे यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व  विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.पद्मश्री आवटे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here