युनियन बँकेच्या धामोड शाखेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न…!

0
98

तुरंबे (वार्ताहर): युनियन बँकेच्या धामोड शाखेत मंगळवारी रात्री दरोड्याचा प्रयत्न झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीला आले. अज्ञात चोरट्यांनी बँकेत प्रवेश करून रोख रक्कम व सोने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या तिजोरीत हा ऐवज ठेवण्यात आला होता ती तिजोरी चोरट्यांना फोडता आली नाही.

प्रत्यक्षात सोशल मीडीयातून तसंच काही माध्यमांतून बँकेवरील दरोड्यात कोट्यवधी रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याच्या बातम्या पसरल्यामुळं बँकेचे खातेदार हवालदिल झाले. चोरीची माहिती समजेल तशी खातेदार बँकेत गर्दी करत होते. पोलीसांनी बँकेच्या अधिकार्‍यांसमक्ष लॉकर मधील रक्कम आणि सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याची खात्री केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत चोरीच्या प्रयत्नाचा गुन्हा राधानगरी पोलीस ठाण्यात दाखल झाला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here