उदय पवार आजरा पंचायत समिती सभापती-वर्षा बागडी उपसभापती…!

0
147

आजरा (प्रतिनिधी):आजरा पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीचे उदय पवार यांची तर उपसभापती पदी वर्षा बागडी यांची बिनविरोध निवड झाली.तहसिलदार विकास अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

सभापती पदासाठी पवार यांच्या सह बशीर खेडेकर इच्छुक होते. जि.प.सदस्य जयवंतराव शिंपी गटाने खेडेकर यांच्या नावांवर ठाम राहिल्याने निवडी मध्ये तिढा निर्माण झाला होता. पाच सदस्य राष्ट्रवादीचे तर एक बागडी विरोधातील आहेत.या निर्माण झालेल्या तिढ्याचा फायदा आयता बागडी यांना मिळाला.सुकाणू समितीच्या मध्यस्थी नंतर पहिले १० महिने पवार, पुढील ८ महिने खेडेकर तर उर्वरित शिरीष देसाई यांना देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे खेडेकर यांनी माघार घेतली. यामुळे सभापती पदी पवार यांची निवड बिनविरोध झाली.

नुतन पदाधिका-यांचे तहसिलदार अहिरे यांनी सत्कार केला. पंचायत समिती ला पुरेसा निधी शासनाकडून मिळत नाही. तालुक्याची गरज म्हणून पाठपुरावा करुन विकास साधण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here