विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवरील कारवाई थांबवा;वाहनधारक संघटनेची मागणी

0
69

कोल्हापूर प्रतिनिधी: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर सुरु असणारी दंडात्मक कारवाई थांबवण्यात यावी या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघातर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टीवन अल्वारीस यांना देण्यात आले.

कोल्हापूर शहरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे.कोल्हापूर शहरातील विद्यार्थी वाहतूक व्यवस्था यांची भिस्त रिक्षावर आहे व त्यामुळे पालक गेली अनेक वर्षे रिक्षांचे नियोजन पूर्व व्यवस्था व शिस्त यामुळे पालक निश्चिंत आहते. पण या कारवाईमुळे विद्यार्थी व पालक हैराण झाले आहेत. तरी याची योग्य ती दखल घेऊन शासनास अहवाल पाठवून या रिक्षांवरील कारवाई थांबवावी असे शिष्टमंडळांनी स्टीवन अल्वारीस यांच्याशी चर्चेदरम्यान बोलताना सांगितले.

यावेळी अध्यक्ष अभिषेक देवणे,कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड, दिलीप सूर्यवंशी, राजू जाधव, जुनेद खान, रफिक हलीमा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here