चिंचवाड मध्ये रविवारी ग्रामीण साहित्य संमेलन…!

0
141

गांधीनगर (प्रतिनिधी) :चिंचवाड (ता.करवीर) येथे रविवारी (दि. २९) अकरावे ग्रामीण युवा मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. ‘साखर पेरा’ कादंबरीचे लेखक डॉ. मोहन पाटील संमेलनाध्यक्ष तर पानिपतकार विश्वास पाटील उद्घाटक असून स्वागताध्यक्ष उद्योजक अनिल पाटील आहेत.

सृजनशक्ती श्रमिक फाउंडेशन कोल्हापूर, सृजनशक्ती साहित्य विचार मंच चिंचवाड आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या सहयोगातून संमेलन होत आहे.प्रा. बी. ए. चौगुले ग्रंथदिंडीचे उद्घाटक असून अध्यक्षस्थानी कवी  विजय बेळंके आहेत. पु. ल. देशपांडे सभामंडपाचे उद्घाटन संतोष पांचाळ यांच्या हस्ते होणार आहे. आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, डी. ए. पाटील, वीर सेवादलाचे अध्यक्ष शशिकांत राजोबा प्रमुख पाहुणे आहेत. आसाराम कसबे सुप्रिया अय्यर, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. रणधीर शिंदे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे निरिक्षक आहेत.

विश्वास पाटील यांची मुलाखत डॉ. रावसाहेब पाटील (सोलापूर) व सृजनचे अध्यक्ष संजय पाटील घेणार आहेत. ग्रामीण कथाकार शंकर पाटील साहित्य पुरस्कार पानिपतकार विश्वास पाटील यांना व सोलापूर येथील पंचरंग प्रबोधिनीचे संपादक व चिंचवाडचे सुपुत्र रावसाहेब पाटील यांना समाज प्रबोधन साहित्यसेवेसाठीचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बाबासाहेब परीट यांचे कथाकथन होणार आहे. समारोप व सत्कार समारंभात प्रमुख वक्ते संपतराव गायकवाड तर अध्यक्षस्थानी विश्वास सुतार आहेत. एस. बी. पासना, अविनाश पाटील, सुरेश राठोड,  उत्तम पाटील, आनंदराव पाटील व भाग्यश्री दोडाळे यांचा सत्कार यावेळी होणार आहे.

सुनील स्वामी व त्यांचे सहकारी यांचा संविधानाचा जागर हा पोवाडा व काव्यानंदन संपन्न होणार आहे. सुरेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली काव्यसंमेलन होईल. त्यात उस्मानाबादचे प्रशांत गुरव, अहमदनगरचे डॉ. स्वप्नील चौधरी, अकोल्याचे आनंदराव राऊत,  मंदार पाटील व प्रा. संदीप पाटील सहभागी असतील. कवी रोहित शिंगे निवेदक आहेत. प्रा. कृष्णात खोत,  नीलम माणगावे प्रमुख पाहुणे आहेत. नीलम मालगावे लिखित संविधान ग्रेट भेट, रावसाहेब पाटील संपादित पंचरंग प्रबोधनी अध्यक्षीय भाषण विशेषांक,   नयना पाटील संपादित ‘संस्कृत बालबोध’ ‘गीत बाल जगताचे’ व ‘बालगीताचा मळा’चे प्रकाशन यावेळी होणार आहे. संमेलनाचे संयोजक सृजन परिवाराचे अध्यक्ष संजय पाटील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here