सोने-चांदी कारागीर मोफत ओळख पत्र नोंदणीस प्रतिसाद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन ,महाराष्ट्र राज्य व भारत सरकार अधिकृत ज्वेलरी कौन्सिल यांच्या एकत्रित समन्वयाने, आयोजित केलेल्या जिल्ह्यातील सोने व चांदी कारागीरांसाठी, मोफत ओळखपत्र नोंदणी कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.

कार्ड नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रजिस्ट्रेशन झालेल्या सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशनच्या सर्व सभासदांना मोफत रु. २५०००/ चा मेडीक्लेम लागु होणार आहे. तसेच कौसीलच्या माध्यमातून सभासदांना केंद्र व राज्य सरकारकडे कारागीर म्हणून नोंदणी झालेने सुवर्णकार व चांदी कारागीरांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व शासकीय योजनांचा लाभही प्राप्त होणार आहेत.

जवळपास १५ विविध प्रकारचे फायदे या नोंदणीद्वारे सभासदांना मिळणार आहेत. त्यामधे मोठमोठ्या ज्वेलरी एक्झिबिशन मधे नाममात्र फी मधे सहभाग, सोने चांदी मेटल खरेदीसाठी पात्रता, भारतातील मुंबई येथे उभारण्यात येणार्या सर्वात मोठ्या ज्वेलरी पार्कमध्ये स्वतःची जागा नाममात्र पैशात घेण्याची संधी सर्वसामान्य कारागीरांना मिळणार आहे असे सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन अध्यक्ष नचिकेत रविंद्र भुर्के यांनी नमुद केले.
अशा पद्धतीने ज्वेलरी व्यवसायातील विविध संधीचे दालन कारागीरांसाठी या ओळखपत्रामुळे उघडणार असलेने कारागीरांमधे समाधानाची प्रतिक्रिया निर्माण झाली आहे. कोल्हापुरात सुवर्णकार व चांदी कारागीरांसाठी प्रथमच ज्वेलरी क्षेत्रातील मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशनचे सर्वच कारागीरांनी आभार व्यक्त केले.

यावेळी सोने चांदी कारागीर बहुउद्देशीय असोसिएशन अध्यक्ष श्री नचिकेत भुर्के, दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष श्री सुधाकर पेडणेकर, सोने चांदी कारागीर असोसिएशन उपाध्यक्ष श्री प्रकाश घाटगे, सचिव गोपीनाथ नार्वेकर, खजानिस विजय औंधकर, कार्याध्यक्ष दत्तात्रय म्हसवेकर, सहसचिव सचिन ढणाल, भगवान निंबाळकर, सविता पाटील, संजय नार्वेकर, चंद्रकांत नार्वेकर, पंढरीनाथ कारेकर व कोल्हापुरातील शेकडो सुवर्णकार बंधु मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.