प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन पदी नामदेव रेपे;व्हा.चेअरमन पदी अरुण पाटील

218

कोल्हापूर प्रतिनिधी: प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या चेअरमन पदी नामदेव रेपे यांची तर व्हा.चेअरमन पदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सहाय्यक निबंधक अमित गाडे यांच्या अध्यक्षस्थानी हि निवड प्रक्रिया पार पडली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांना सोबत घेऊन पारदर्शी कारभार करू अशी प्रतिक्रिया नूतन पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. दिलीप पाटील आणि बाजीराव कांबळे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली होती. विरोधी गटाकडून सुरेश कोळी यांनी चेअरमन पदासाठी तर व्हा.चेअरमन पदासाठी प्रसाद पाटील यांनी अर्ज दाखल केला होता.

चेअरमन पदासाठी नामदेव रेपे यांचे नाव दिलीप पाटील यांनी सुचवले तर व्हाईस चेअरमन पदासाठी अरुण पाटील यांचे बाजीराव पाटील यांनी नाव सुचवले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलकर्णी, दिलीप पाटील, प्रसाद पाटील, राजमोहन पाटील ,बाजीराव कांबळे,शिवाजी पाटील,बजरंग लगारे,संभाजी बापट, गणपती पाटील,अण्णासो शिरगावे, धोंडीराम पाटील उपस्थित होते.