शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…!

0
120

कोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्ह्यात १४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले आहे. यामध्ये दाखल ३६२५ प्रकरणे तर १२९६४ दाखलपूर्व असे एकूण १६५८९ प्रकरणे निवाडयासाठी ठेवली जाणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघून पक्षकारांचे समाधानी केले जाणार असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अधीक्षक सुनिल मिठारी, ॲड. शल्पिा सुतार आदी हजर होते.

न्यायाधिश देशपांडे यांनी सांगितले की, यापूर्वी गाव पंचायतीसमोर न्याय निवाड्याचे काम केले जात होते. दोन्ही बाजूच्या लोकांना सामजस्याने, समजुतीने सांगून त्यांच्यातील तंटे मिटवले जात होते. सध्या लोक न्यायालय म्हणजे गाव पंचायतीचेच आधूनिक रुप आहे. लोकन्यायालये राज्यातील सर्वच न्यायालयांमध्ये विधी व प्राधिकरणामार्फत राबवली जात आहेत. यामध्ये किमान तीन जाणकार व्यक्तींचे पॅनेल न्यायाधिशांची भूमिका बजावते.

शनिवारी १४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोक अदालतीचे जिल्हा व तालुक्यातील सर्व न्यायालयात कामकाज चालणार आहे. यात मोटार अपघात,भू संपादन, कलम ३८ प्रमाणे अशी १६५८९ प्रकरणे निवाड्यासाठी ठेवली आहेत. पक्षकारांना फायदा होऊन प्रलंबित प्रकरणे मार्गी लागावीत यासाठी अशा प्रकारचे लोक अदालतीचे आयोजन दर सहा महन्यिात ठेवले जाते. २५ नोव्हेंबर २०१९ ते ३० नोव्हेंबर २०२० असे वर्षभर संविधान वर्ष साजरे केले जाणार आहेत, यामध्ये विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचे न्या. देशपांडे यांनी सांगितले.याचबरोबर एखादी महिला पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना ताटकळत थांबले जाते. यामुळे महिला पोलीस ठाण्यांची पायरी चढत नाहीत. अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. महिलांना पोलीस,न्याय व्यवस्था यांच्याकडून तातडीने मदत व्हावी यासाठी भविष्यात प्राधिकरणामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी स्वयंसेवकाची निवड केली जाणार असल्याचे न्या. देशपांडे यांनी सांगितले.लहान मुलांचे लैगिक शोषणाचे प्रमाण वाढत आहे. यासाठी ‘गुड टच व बॅड टच’ याची जाणीव मुलांना व्हावी. त्यांना कोणी त्रास देत असेल तर त्यांनी याबाबत पालक,शक्षिक यांच्याशी संवाद साधावा, पोलीसांना फोन करावा यासाठी मुलांचे प्रबोधन केले जात आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आतापर्यंत ७ शाळा, महावद्यिालयात कार्यशाळा घेतली असल्याचे न्या. देशपांडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here