शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार महान चूक ठरेल : एन. डी. पाटील

0
107

कोल्हापूर : शिवाजी विद्यापाठीची स्थापना झाली. त्याचवेळी त्याला नाव देताना सर्व बाजूंचा विचार करून हे नाव ठरवण्यात आले होते. राज्याचे पहिले मुख्यंमत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी फार विचाराअंती हा निर्णय घेतला होता, आता विद्यापीठाचा नामविस्तार करणे म्हणजे ती महान चूक ठरेल, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी आज दिला.

पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने विद्यापाठीचा नामविस्तार करू नये, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना आज दिले. यावेळी डॉ. पाटील यांनी विद्यापीठाच्या नामकरणाचा इतिहासच सर्वांसमोर मांडला. याबाबत आमची भुमिका स्वच्छ आहे, हा वाद इथेच मिटला तर याच्याइतके समाधान नाही. ज्यांनी प्रस्ताव सुचवला, ज्यांनी पाठपुरावा केला, त्यांना एक विनंती आहे की त्यांनी हा प्रश्‍न वादाच्या भोवऱ्यात आणू नये, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी यावेळी केले.

डॉ. पाटील म्हणाले,” या प्रश्‍नावर यापुर्वी चर्चा झालीच नाही असे नाही. जाहीररित्या यावर चर्चा झाली. विद्यापीठ स्थापन करायचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. त्यासाठी समिती नेमली, त्यात मान्यवर शिक्षण तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली नेमली. त्या समितीच्या अहवालानुसार विद्यापीठाचे नाव दिले गेले. साहजिकच त्यावेळी शिवाजी महाराजांच्या नावे विद्यापीठ होतंय म्हटल्यावर त्यात छत्रपती शिवाजी असावे अशा प्रतिक्रिया आल्या. त्याचेही जाहीर उत्तर त्या समितीने दिले. सरकारनेही आपले म्हणणे दिले. जो युक्तीवाद आम्ही आज करतोय तो त्यावेळीही झाला आहे. पुर्व विचारांती हा निर्णय झालेला आहे. यावर लोकांनी फारसा वाद घालू नये.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here