प्लॅस्टिक वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांना महानगरपालिकेकडून दंड

0
93

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आज सात व्यापाऱ्यांकडून पस्तीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक व थर्माकोल इत्यादीपासून तयार केलेले वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, किरकोळ विक्री तसेच उत्पादन करणारे नागरिक व व्यावसायिक यांच्यावर महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

याअंतर्गत आज लक्ष्मीपूरी व बाजारगेट परिसर येथील आदर्श शिंदे, श्री प्लास्टिक, कार्तीक ट्रेडर्स, गुरुदत्त स्विट मार्ट, जीओ पॅकिंग मटेरिअल, कोहिनूर एंटरप्रायजेस व न्यु एन्जॉय शॉपी यांच्यावर प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई करुन प्रत्येकी रु.5000/- प्रमाणे एकूण रु. 35,000/- रुपये दंड वसूल केला. सदरची कारवाई आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागिय आरोग्य निरीक्षक राहूल राजगोळकर, सहा.आरोग्य निरीक्षक दिलीप पाटणकर, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, सुशांत कावडे, नंदकुमार पाटील, श्रीराज होळकर, स्वप्नील उलपे, विकास भोसले, महेश भोसले, सुशांत कांबळे, मुनीर फरास, माधवी मसुरकर, शुभांगी पवार, सौरभी घावरी व गीता लखन यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here