आदमापूर ग्रामपंचायतीचे श्री.बाळूमामा देवालय समितीला निधीसाठी पत्र

मुरगूड: आदमापूर ग्राम पंचायत अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास सुविधा कामासाठी श्री बाळूमामा देवालयाच्या वार्षिक उत्पन्नापैकी 10 टक्के रक्कम आदमापूर ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात यावी याबाबतचे पत्र श्री बाळूमामा देवालय समितीला देण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे सरपंच विजय गुरव यांनी दिली.

श्री. बाळूमामा देवालयास मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील भाविक भेट देत असतात सदर भाविक भक्तांमुळे गावामध्ये कचरा, सांडपाणी, वाहतुकीची कोंडी होत आहे. आदमापूर ग्राम पंचायतीकडे सदरची व्यवस्था करणेकरिता पुरेसा निधी प्राप्त होत नसलेमुळे तहसिलदार भुदरगड व पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे भुदरगड यांचे उपस्थित झालेल्या अमावस्या यात्रा नियोजन बैठकीमध्ये देवालय समितीस प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये प्राप्त होणाऱ्या निधी पैकी १०% निधी हा मौजे आदमापूर ग्रामपंचायतीकडे वर्ग करावा अशा सूचना केल्या असल्याचे गुरव यांनी सांगितले.

श्री बालूमामा देवालय समिती कडून वार्षिक उत्पनाच्या १० निधीमधून करण्यात येणाऱ्या विकास कामांबाबत सरपंच गुरव म्हणाले, भाविकासाठी सार्वजनिक सुलभ शौचालय सुविधा, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ओला व सुका कचरा संकलन,वर्गीकरण खत निर्मिती, सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया केंद्र ,दोन चाकी चार चाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, बाळू मामांच्या बकऱ्यासाठी सुसज्य तळाची बैठक व्यवस्था, श्री. बाळूमामा चे देहावसान ठिकाण श्री मरगाई देवालयासह मराठी शाळा नवीन बांधकाम करणे,परिसर सुशोभीकरण, गावातील नागरिक तसेच भाविकांसाठी अंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था करणे ,महिला बचत गटाना फिरता निधी देऊन उद्योग निर्मिती करणे, ग्रामदैवत श्री हनुमान देवालय मंदिर व परिसर सुशोभीकरण करणे श्री विठ्बाई देवालय कडे जाणारा रस्ता करणे व देवालय परिसर सुशोभीकरण करणे, आवश्यकतेनुसार बंधिस्त गटर बांधकाम करणे गावातील रस्ते खडीकरण डांबरीकरण करणे वाढीव गावभागातील गटर व रस्ते करणे या विकास कामासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सरपंच गुरव यांनी सांगितले.