विश्वास पाटील यांच्या मातोश्रींच्या स्मृतिदिनानिमित्त अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन…!

0
417
शिरोली दुमाला प्रतिनिधी: गोकुळचे माजी चेअरमन तसेच विद्यमान संचालक विश्वास नारायण पाटील यांच्या मातोश्री  श्रीमती जनाबाई नारायण पाटील यांचा दहावा स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने कबड्डी, रांगोळी स्पर्धा तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
दरवर्षी स्मृतिदिनानिमित्त पाटील परिवाराकडून सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतात. यावर्षीही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्त पेटी मधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन विश्वास पाटील यांनी मातोश्रींच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिर आणि  रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रमास  ग्रामस्थांनी अभुतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल आयोजक विश्वास नारायण पाटील यांनी  सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. दरवर्षी मातोश्रींच्या स्मृतिदिनानिमित्त  पाटील परिवार  सामाजिक उपक्रम राबवतात त्यांच्या या कामाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे.
यावेळी करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी, बाजीराव पाटील, सरदार पाटील,  तसेच ग्रामपंचात  सरपंच,सदस्य, संस्थेचे पदाधिकारी, तरुण मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here