तळ्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू.

0
157

कोल्हापूर/प्रतिनिधी:करवीर तालुक्यातील सांगरुळ गावातील पाय घसरून तळ्यात पडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.चंद्राबाई बळिराम चव्हाण(वय.६४,रा. सांगरुळ ता. करविर)असे त्यांचे नाव आहे.सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

सांगरुळ येथे चंद्राबाई बळिराम चव्हाण या कुटुंबियांसोबत राहतात. सोमवारी सकाळी त्या घरातून फिरण्यासाठी बाहेर पडल्या. मात्र, उशिरा झाल्या तरी घरी न आल्याने त्यांचा नातेवाईकांनी शोध घेतला. शोधा दरम्यान अज्ञात महिलेचा गावातील तळ्यात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत चंद्राबाई यांना बाहेर काढून बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here