कोल्हापूर/प्रतिनिधी:फुलेवाडी येथे पूर्ववैमनस्यातून धारधार हत्याराने वार केल्याने दोघे गंभीर जखमी झाले.मनीष उर्फ मनोज बाबुराव बोडेकर(वय.३२ रा.६ वा,बस स्टॉप, फुलेवाडी)आणि सचिन उर्फ भागोजी महादेव बोडेकर(वय.२५ ,रा.फुलेवाडी, रिंगरोड) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी सिपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.सोमवारी पहाटे ही घटना घडली.घटनेच्या काही अवघ्या तासात पोलिसांनी आरोपीना अटक केली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,मनीष उर्फ मनोज बाबूराव बोडेकर आणि सचिन उर्फ भागोजी महादेव बोडेकर हे दोघेही नातेवाईक आणि जिवलग मित्र आहेत.यांचा राग मनात धरून ओमकार पाटील,अनिकेत पाटील,ऋषिकेश जरग, सुरेश लांबोरे,अनिकेत निगडे आणि सुनील खोत यांनी सचिन बोडेकर याच्यासोबत तु का फिरतोस अशी विचारणा करत, मनीष बोडेकर याला जमावाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भावाला मारहाण केल्याने सचिन बोडेकर यानें आरोपी ना जाब विचारला, आरोपी नि याचा राग मनात धरून फुलेवाडी रिंगरोडवर काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच ओमकार पाटील यांने बोडेकर यांना तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी देत. तलवारीने सचिनच्या डोक्यावर आणि पायावर वार केला. यामध्ये सचिन गंभीर जखमी झाला.परिसरातील नागरिक गोळा होवू लागल्याने संशयितानी घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत जखमीचे नातेवाईक धनाजी बाबुराव बोडेकर (वय.३५)यांनी लक्ष्मीपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी काही अवघ्या तासात संशयित ऋषिकेश किरण जरग(वय.२१,रा. फुलेवाडी,२ रा, बस स्टॉप) सुरेश बिरु लांबोरे(वय.२४ फुलेवाडी, बोंद्रेनगर रिंगरोड) अनिकेत सर्जेराव निगडे(वय.२३) आणि सुनील बाबू खोत(वय.२५ रा. नागदेववाडी,ता. करवीर) यांना अटक केली. तर ओमकार राजकुमार पाटील (वय.६वा बस स्टॉप, फुलेवाडी) आणि अनिकेत बाबुराव पाटील(वय.२३,रा.२ रा.बस स्टॉप, फुलेवाडी)हे फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.