कैदी महिलेचा मृत्यू.

0
51

कोल्हापूर/प्रतिनिधी:कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैदीचा छातीत कळ येवून बेशुद्ध पडल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाला.अनिता दत्तू शिंदे(वय.४५ सध्या रा. कळंबा जेल, मूळ, जयसिंगपूर)असे तिचे नाव आहे.रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. 

अनिता शिंदे या बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्ह्यात दोषी ठरल्याने कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. रविवारी रात्री एकच्या सुमारास त्यांना छातीत कळ आल्याने बेशुद्ध पडल्या.कारागृहातील सुरक्षा रक्षकानी त्यांना त्वरीत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यांची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here