नैराश्यातुन शाळकरी मुलाची आत्महत्या

0
197

कोल्हापूर/प्रतिनिधी: सानेगुरुजी येथील शाळकरी मुलाने नैराश्यातुन राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.दानेश अश्फाक मकानदार(वय.१६ रा. शिवगंगा कॉलनी, सानेगुरुजी) असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. रविवारी रात्री ही घटना उघडकीस आली. यांची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.

सानेगुरुजी वसाहत येथील शिवगंगा कॉलनीत  दानेश अश्फाक मकानदार हा आपल्या आत्याकडे राहतो. तो  एका शाळेत शिक्षण घेत होता. त्याचे आईवडील हे कामानिमित्त झारखंड येथे असतात.गेली काही दिवस दानेश कोणाशी जास्त बोलत नव्हता.रविवारी रात्री घरात कोणी नसल्याचे पाहून,त्यानें रूममधील लाकडी ओंडक्यास  दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. नातेवाईक घरी आल्यावर हा प्रकार निदर्शनास आला. नातेवाईकांनी दानेशला  खाली उतरून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.मात्र, उपचारापूर्वीच दानेशचा मृत्यू झाल्याचे सांगितले.यांची माहिती मिळताच माकानदार यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.सततच्या अबोला स्वभानाने दानेशने नैराश्यातुन आत्महत्या केल्याचे बोलले जाते. यांची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here