नवीन वाशीनाका येथे घरफोडी :साडेतीन तोळ्यांचे दागिने लंपास

0
145

कोल्हापूर/प्रतिनिधी:नवीन वाशी नाका इथल्या व्ही आर कॅसल या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील चोरट्याने बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून साडे तीन तोळे सोन्याचे दागिने आणि २ हजार  ५०० रुपयांची रोकड  लंपास केली.शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत फत्तेसिंह हिंदुराव निंबाळकर(वय.५० रा. व्ही आर कॅसल अपार्टमेंट, नवीन वाशीनाका)यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,नवीन वाशीनाका या उपनगरातील व्ही आर कॅसल अपार्टमेंटमधील चौथ्या मजल्यावर शरद पाटील यांचा फ्लॅट आहे. याठिकाणी सध्या फत्तेसिंह निंबाळकर हे कुटुंबियांसोबत भाड्याने राहतात. शुक्रवारी(२९) ते आपल्या कामानिमित्त परगावी गेले होते. तर त्यांची पत्नी नोकरी निमित्त बाहेर गेल्या होत्या.  चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. तिजोरीतील सोन्याचे टॉप्स, सोन्याची चैन आणि  इतर सोन्याचे दागिन्यासह अडीच हजारांची रोकड असा सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.निंबाळकर यांच्या पत्नी घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.दरम्यान पत्नी निंबाळकर यांनी फोनवरून याची माहिती पती फत्तेसिंह निंबाळकर यांना दिली. पती घरी आल्यावर याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. तसेच फत्तेसिंह निंबाळकर यांनी प्रकरणी करवीर पोलिसात अज्ञाता विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला,असून सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे चोरट्याचा माग काढत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here