समाज कोणत्याही क्षेत्रात बदल घडवू शकतो : आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी

0
224

कोल्हापूर प्रतिनिधी : लोकसहभागातून एड्स निर्मुलन हा एक सामाजिक कार्याचा भाग असून समाजातील सर्व घटक एकत्र येऊन एड्स विरोधी लढा तीव्र केल्यास, हा आजार व एचआयव्ही विषाणू हद्दपार होण्यास उशीर लागणार नाही, असे  कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी यांनी काढले. जिल्हा एड्स नियंत्रण पथकाद्वारे १ डिसेंबर जागतिक एड्स दिनी आयोजित केलेल्या प्रभात फेरीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले की, जिल्ह्य़ातील नवीन एचआयव्ही संसर्गितांची संख्या घटत आहे हि फारच आशादायक बाब आहे. समाज एकत्र आल्यास अनेक बदल घडू शकतात. सर्वांनी एकत्र येऊन एड्स विरोधी लढा दिल्यास संपूर्ण एड्स मुक्ती अवघड नाही.

सिनेअभिनेते आनंद काळे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा एड्स संसर्गितांच्या बाबतीत राज्यात पहिल्या पाचमध्ये आहे याला विविध कारणे असू शकतात. प्रत्येकाने आपल्या बरोबर इतरांना एचआयव्ही बद्दल माहिती देऊन, एचआयव्ही तपासणी करून घेतल्यास एडसमुक्ती होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी प्रत्येक घटकांने पुढे आले पाहिजे.
मुख्यकार्यकारी अमन मित्तल म्हणाले, एचआयव्ही संसर्गितांना आधार देण्याचे काम प्रत्येकांने करायला हवे. याबद्दल समाजात असणारे समज, गैरसमज दुर करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे.

प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही रुग्णांची सध्यस्थिती सांगितली. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स च्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘संवेदना-जागर’ या कार्यक्रमाची घोषणा शिपूरकर यांनी केली.शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी उपस्थितांना एडसमुक्तीची शपथ दिली. विशाल पिंजानी यांनी मनोगत व्यक्त केले.माहिती, शिक्षण व संवाद क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ग्रामीण रुग्णालय मलकापूरचे समुपदेशक क्रांतिसिंह चव्हाण व खासगी क्षेत्रात एड्स नियंत्रणासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल इचलकरंजी येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे डॉ. राजेश पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सिनेअभिनेते आनंद काळे, अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी.केम्पी पाटील, किर्लोस्कर चे जनरल मॅनेजर धीरज जाधव, बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर,प्राचार्या डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ.विलास देशमुख, संवेदना उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कृष्णा गावडे, क्रिडाधिकारी सुधाकर जमादार,अधिसेविका शामल पुजारी, मकरंद चौधरी, कपिल मुळे, संदीप पाटील यांच्यासह जिल्ह्य़ातील एड्स नियंत्रण कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी,रोटरी सनराईज, शहरातील महाविद्यालयांचे विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here