राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी चुरस…!

0
163

मुंबई प्रतिनिधी: नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर म्हणजे २२ डिसेंबरनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद मिळणार असून, त्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी शनिवारी दिले आहेत. तथापि, मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढली असल्यानेच जाणीवपूर्वक हे बोलले जात असून मंत्रिमंडळाचा विस्तार हा नागपूर अधिवेशनापूर्वीच होईल, असे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतील ज्येष्ठ नेते खासगीत देत आहेत.

तिन्ही पक्षांतील इच्छुकांचा आपापल्या नेत्यांवर प्रचंड दबाव असून त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हा दबाव अधिक आहे. त्यामुळेच ही रणनिती ठरविण्यात आल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला आणि विधानसभेचे अध्यक्ष अशी दोन्ही पदे हवी होती. मात्र, राष्ट्रवादीने यातील एकच पद मिळेल, असे स्पष्ट केल्यानंतर याबाबतचा वाद संपुष्टात आला आहे. काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद देण्याचे मान्य झाले असून, या पदासाठी वैदर्भिय आमदार नाना पटोले यांची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळणार हे निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी आणि यांच्यात रस्सीखेच असल्याचे राष्ट्रवादीच्या वर्तुळात बोलले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पश्चिम महाराष्ट्रात हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील, माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांची पत्नी सुमन पाटील, मावळचे सुनील शेळके, विदर्भातून अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, मराठवाड्यात राजेश टोपे, प्रकाश सोळुंके, संदीप क्षीरसागर, कोकणात शेखर निकम, मुंबईतील एकमेव आमदार नवाब मलिक, खान्देशातून नरहरी झिरवळ अथवा डॉ. किरण लहामटे अशा नावांची इच्छुकांमध्ये पक्षात चर्चा आहे. अजित पवारांसाठी शिवसेना राजी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देणार किंवा कसे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू असली तरी शिवसेनेकडून अजित पवार यांचा योग्य सन्मान राखला जायला हवा, असा दबाव आहे. हे सरकार स्थिर राहायचे असल्यास अजित पवार यांच्या मनात कोणताही किंतू असता कामा नये, असे स्वतः शिवसेनेच्याच नेत्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या बंडानंतर खूश झालेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव वाढला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अजित पवार यांच्याकडे तीन महत्त्वाची खाती येण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here