शाळकरी मुलाने टाकाऊ वस्तू व पाण्याच्या वापरातून वीजनिर्मितीद्वारे घरगुती विजेचा बल्ब लावण्याचा केलेला प्रयोग यशस्वी…

कागल/प्रतिनिधी◆गोरख कांबळे.

सिद्धनेर्ली येथील शेतकरी कुटूंबातील शाळकरी मुलाने टाकाऊ वस्तू व पाण्याच्या वापरातून वीजनिर्मितीद्वारे घरगुती विजेचा बल्ब लावण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे. हा बल्ब सलग पाच तास सुरू राहतो. समर्थ संदीप पाटील असे या तेरा वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. येथील सिद्धनेर्ली विद्यालय मध्ये तो इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत आहे.

लॉकडाऊन नंतर नियमितपणे शाळा सुरू झाल्यानंतर या प्रशाले मार्फत शालेयस्तरावर विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक गुणांना चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन घेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी उपकरणे तयार करून आणण्याबाबत सांगितले होते.

याबाबत त्याने वडिलांच्या मोबाईलवर युट्युबवर या प्रयोगाबाबत माहिती घेतली. त्यासाठी खराब ब्लेडची दोन पाती, वायर, एक एलईडी बल्ब, एक स्वीच, एक होल्डर व पाणी इतके साहित्य वापरले. यापैकी एलईडी बल्ब, स्विच व होल्डर इतकेच अडीचशे रुपयापर्यंतचे साहित्य त्यांने खाऊच्या पैशातून विकत घेतले. उर्वरित साहित्य घरातील टाकाऊ साहित्यातून उपलब्ध केले. वायरच्या एका टोकाला ब्लेडची दोन पाती जोडली आहेत.तर दुसऱ्या टोकाला होल्डर व बल्ब जोडला आहे.तर मध्यभागी आवश्यकतेनुसार बल्ब सुरू किंवा बंद करण्यासाठी स्विच जोडला आहे.ब्लेडची दोन्हीही पाती पाण्यात बुडविली की बल्ब प्रकाशित होतो.

याबाबत शास्त्रीय माहिती देताना त्याचे मार्गदर्शक विज्ञान शिक्षक संदीप वर्णे म्हणाले,पाण्याचे रेणुसूत्र H2O आहे यामध्ये H + IONS व OH – असतात.

ब्लेड हे electrodes म्हणून कार्य करतात पाण्यामध्ये ब्लेड मधील chromium व कार्बन हे दोन्ही धातू धन व ऋण ध्रुव म्हणून कार्य करतात व wire मधील तांबे ही electrons ची विद्यूतशक्ती वाहून नेतात .त्यामुळे बल्ब प्रकाशित होतो. यासाठी त्याला संस्थाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे, प्रशासनाधिकारी एम.व्ही.वेसविकर, प्राचार्य ,पर्यवेक्षक व शिक्षक यांचे प्रोत्साहन मिळाले.