मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार…!

0
545

मुंबई प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रपती राजवट शनिवारी संपुष्टात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राजभवनात शपथ घेतली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत हा शपथसोहळा पार पडला.

महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही पुन्हा एकदा सरकार स्थापन करत असून राज्याला स्थिर सरकार देऊ, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजभवनवर दिली. राज्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असल्याचे काल जवळपास निश्चित झाले होते. तर आज सकाळी अनपेक्षित अशा घटना घडल्या.राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत न जाता भाजपचा साथ दिली. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनवर जात सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here