ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन मार्फत जननायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात

0
203

कोल्हापूर: येथील ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन कोल्हापूर शाखा यांच्या वतीने जननायक बिरसा मुंडा यांची १४४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.तसेच त्यांनी केलेल्या कार्या विषयी माहिती देण्यात आली. अमित पोटकुले, उपाध्यक्ष प्रभाकर भोये ,सुभाष धादवड, अध्यक्ष संतोष आंबेकर आदींनी मनोगते व्यक्त केली .या कार्यक्रमात प्रसाद गभाले यांचा राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा भालाफेक द्वितीय क्रमांक आल्याबद्दल तसेच विनायक वडेकर मुलाचा थ्रो बॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष बांबळे यांनी केले आभार नितीन गभाले यांनी केले .यावेळी भगवान शिंगाडे , सोनू तुरे ,रुपेश नाडेकर, मच्छिन्द्र बगाड,सोमनाथ कवठे,नितीन जोशी , प्रभाकर केंगले,संतोष मोरमारे ,रामा वडेकर आदी आदिवासी बांधव व बालचमू उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here