शिवसेनेचा अमित शहांवर पलटवार

0
324

मुंबई प्रतिनिधी : अमित शहा हे लोकसभा निवडणुका होईपर्यंत का बोलले नाहीत की समसमान सत्तावाटपाचं काही ठरलं नाही. आम्ही व्यापारी नाही. आम्ही शब्दाला जागतो,’ असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्हाला पंतप्रधानांना खोटं पाडायचं नव्हतं. शिवसेनेनं कधी राजकारणाचा व्यापार केला नाही. बंद दरवाजाआड दिलेली आश्वासनं जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हाच ती उघड होतात. आम्ही पंतप्रधानांचा नेहमीच आदर केला आणि करत राहाणार बंद दाराआडच्या फॉर्म्युल्याच्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत,’ असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

‘निवडणूक काळातच आम्ही वारंवार सांगत होतो की देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, तेव्हा शिवसेना का बोलली नाही,’ असा सवाल अमित शहा यांनी केला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तसंच कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जाणीवपूर्वक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here