मुंबई महानगरपालिकेतला पाठिंबा भाजप काढून घेणार !

0
298

मुंबई: शिवसेनेने भाजपची तीन दशकांची युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी नवा संसार थाटण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंर भाजपने सेनेला कोंडित पकडण्यासाठी मोठा प्लॅन आखला आहे. शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची असलेली मुंबई महानगरपालिकेतला पाठिंबा भाजप काढून घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजपने आज संध्याकाळी 7 वाजता कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. या कोअर कमिटीच्या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सेनेला कोणत्याही परिस्थितीत कोंडित पकडायचं, असा डाव भाजप आखण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे शिवसेना सत्तेत जाऊ नये यासाठी भाजपचे नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत, अशी देखील माहिती कळतीये. त्यामुळे सेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी अतिशय तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

दरम्यान, केंद्रिय मंत्री अरविंद सावंत यांना राजीनामा द्यायला सांगून सेनेने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर भाजप देखील शिवसेेनेला मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here