शाहूच्या चाळीसाव्या गळीत हंगामाचा विधिवत शुभारंभ…1

0
214

कागल प्रतिनिधी : कागल येथील शाहू साखर कारखान्याच्या 40 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांच्या शुभहस्ते गव्हाणीत विधीवत उसाची मोळी टाकून करण्यात आला. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ सदस्य,सभासद , ऊस उत्पादक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण कारखान्याचे अधिकारी , कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी चेअरमन समरजितसिंह घाटगे म्हणाले, या हंगामासाठी कारखान्याने 7 लाख 50 हजार मे. टन गळीतांचे उद्दिष्ट्य निश्चित केले आहे.तसेच डीस्टीलरी साठी एक कोटी दहा लाख लिटर स्पीरिट उत्पादनाचे तर आसवणीसाठी सहा कोटी युनिट वीज उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.ही उद्दिष्ट गाठणे सर्वांसमोर मोठे आव्हान आहे. कारण महापूर आणि अवकाळी पाऊस,यामुळे ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.तसेच ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात पुरबधित झाले आहे.एकूणच ऊस पीक परिस्थिती पाहता हा हंगाम कमी दिवसाचा राहणार आहे .त्यामुळे ऊस पिकाची उचल लवकर होणार आहे.ही परिस्थिती लक्षात घेऊन सभासदांनी, ऊस उत्पादकांनी आपण पिकवलेला सर्व ऊस कारखान्यास पाठवून उद्दिष्ट पूर्ण करण्यास सहकार्य करावे.

ते पुढे म्हणाले,चालू हंगामासाठी पुरबधित क्षेत्र तोडीस प्राधान्यक्रम दिला जाणार आहे.पुरबधित क्षेत्रामूळे साखर उताऱ्यावर ही परिणाम होणार आहे. याचा परिणाम कारखान्याच्या आर्थिक व्यवस्थापनावर ही होणार आहे. हा हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करणेसाठी सर्वांनी एकजूट होऊन निश्चित केलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया.

गव्हाण पूजा ज्येष्ठ संचालक माजी मंत्री वीरकुमार पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.आशाराणी पाटील यांच्या हस्ते, काटा पूजन संचालक भूपाल पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.आनंदी पाटील यांच्या हस्ते झाले.तर सत्यनारायण पूजा संचालक डॉ.टी. ए. कांबळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजुताई कांबळे यांच्या हस्ते बांधण्यात आली.

कारखान्याचे संस्थापक स्व.विक्रमसिंह घाटगे यांनी हा कारखाना राजकारण विरहित चालविला.त्यामुळे आम्हीही तोच कित्ता गिरवित कारखान्याच्या एकूणच कामात राजकीय हस्तक्षेप करणार नाही.तो यापुढेही सर्वाना समानन्यायाने राजकारण विरहीतच चालवला जाईल असे घाटगे यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास संचालक बॉबी माने,डॉ. डी. एस. पाटील,मारुती पाटील,मारुती निगवे, सचिन मगदूम,बाबुराव पाटील,पी. डी. चौगले, संचालिका रुक्मिणी पाटील यांच्यासह माजी संचालक बाळ पाटील, बिद्री चे संचालक दत्तामामा खराडे, सुनीलराज सूर्यवंशी, रामभाऊ खराडे, संजय पाटील बेलवळे,म्हाकवे चे धनाजी पाटील, श्रीकांत भोसले, शंकरराव मेथे, शिवाजीराव डाफळे,नानासो यादव,कृष्णात सोनूले,अशोक पाटील,शंकरराव मेथे, नगरसेविका विजया निंबाळकर, सावित्री पाटील, तसेच राजे बँकेचे चेअरमन एम पी पाटील, नंदू माळकर, त्यांचे संचालक मंडळ,आजी माजी नगरसेवक, शंकर पोवार,शाहू ग्रुप चे संचालक, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व्हॉइस चेअरमन अमरसिंह घोरपडे यांनी तर आभार संचालक युवराज पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here