भाजप-शिवसेनेला शरद पवारांचा ‘हा’ सल्ला….

0
103

मुंबई प्रतिनिधी : भाजप आणि शिवसेनेला लोकांनी सर्वाधिक जागा दिल्या आहेत. त्यांनी सरकार स्थापन करायला हवे. यापूर्वी सगळ्यांनी वेगवेगळी निवडणूक लढविली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्रातील अनेक शब्दांची माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यांच्याजवळ जनादेश आहे, त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे. मित्रांनी एकमेकांशी असे खोटं वागू नये, असे मी वडिलधारी म्हणून सांगतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 

अयोध्या निकालावर बोलताना शरद पवार म्हणाले, की आज न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशासमोर असलेला गंभीर प्रश्न सुटला आहे. समाजातील सर्व वर्गाचे हित पाहून हा निर्णय आला आहे. देशातील जनतेला मला आवाहन असून, या निर्णयाचे स्वागत सन्मानाने केले पाहिजे. तसेच शांती ठेवण्याचे काम केले पाहिजे. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मी सरकारमध्ये होते. मुंबईत झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मला महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठविले होते. न्यायालयाने घेतलेला हा निर्णय देशासाठी आहे. कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here