लोक आपल्याला जोड्याने मारतील या भितीपोटीच सत्ताधारी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले – राजू शेट्टी

0
120

सिल्लोड : ”परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे सत्तास्थापनेसाठीच्या जागेच्या वाटाघाटी सुरु आहेत. विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतरच सत्ताधाऱ्यांना जाग आली. तेव्हाच सत्तेतल्या दोन्ही पक्षांनी नुकसानीची पाहणी सुरु केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर नाही गेल्यास लोक जोड्याने मारतील याच भितीपोटी सत्ताधारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत,” असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्‌टी यांनी केला.

राजू शेट्टी यांनी मंगळवारी (ता.5) औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्‍यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तेव्हा माध्यमांशी बोलताना हे सांगितले. राजू शेट्टी यांनी सिल्लोड तालुक्‍यातील भवन,चिंचखेडा, मंगरुळ हट्टी, बहुली, मांडणा, उंडणगाव, गोळेगाव आणि लिहाखेडी या गावातील नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here