परतूर शहरात डासांचा उपद्रव वाढला ,नगर पालीकेचे झोपेचे सोंग.

0
120

जालना प्रतिनिधी/कैलास चव्हाण
परतूर शहरात डासांचा उपद्रव वाढल्यामुळे डासांचे खुप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. थंडी, तापाच्या रुग्णांत हि वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.काही दिवसा आगोदर नगरपालीकेत अर्ज दिला,काही वेळा सांगण्यात आले पण काही संबंधित अधिकारी यांनी दुर्लक्ष केले आहे. असे असताना जाणूनबुजून परतूर नगर पालीके चे दुर्लक्ष होत आहे. फवारणी पंप फक्त शोपिस म्हणून ठेवलेका असा आरोप होत असून शहरात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फवारणी करण्यात यावी. अशी मागणी परतूर नागरिकांत होत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी सन्मित्र कॉलनी,शिवाजी नगर ,रेणुका नगर,साठे नगर ,जाईद गल्ली, पारधी वाडा,येथे स्वच्छता अभावी ,विविध आजार होत आहे, थंडी, तापाच्या संख्येत वाढ झाली आहे.या कडे नगरपालिकेने लवकरात लवकर डासांचा बंदोबस्त करावा.व परतूर शहरातील गल्ली बोळात फवारणी महिण्यात एक वेळेस करावी असे नागरिकांत बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here