कडकनाथ घोटाळ्यातील महा रयत ॲग्रो कंपनीचा संस्थापक न्यायालयात हजर

0
142

इस्लामपूर : वार्ताहर
राज्यभर गाजलेल्या कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार व महा रयत ॲग्रो कंपनीचा संस्थापकसंशयित सुधीर मोहिते हा अखेर बुधवारी न्यायालयात शरण आला. गेले दोन महिने तो फरार होता. पोलिसांनी त्याला अटक केली.
महाराष्ट्र तसेच कर्नाटक, गोवा, तेलंगणा, केरळ राज्यातील हजारो शेतकऱ्यांनासुमारे ८०० कोटींना महा रयत अँग्रो कंपनीने गंडा घातल्याची शक्यता आहे. याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी संस्थापक सुधीर मोहितेसह सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. यातील तिघांना यापुर्वी पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य सुत्रधार सुधीरफरार होता.

अटकपुर्व जामिनासाठी त्याने न्यायालयात अर्जही केला होता. या अर्जावर सुनावणी होण्यआधीच बुधवारी तो न्यायालयात शरण आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here