राम-रहिमच आम. प्रकाश आबिटकर यांची विजयी पताका डौलाने फडकवतील : राजेखान जमादार

0
96

आजरा, प्रतिनीधी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी गेल्या 5 वर्षाच्या कादकीर्दिमध्ये राधानगरी विधानसभा मतदार संघातील गेली कित्येक वर्षे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली असून त्यांच्यामध्ये असणारे सर्वधर्मसमभावाची आपुलकी पहाता राम-रहीम हेच आमदार प्रकाश आबिटकर यांना विजयी करुन भगवी पताका डौलाने फडकवतील असे प्रतिपादान मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केले. ते आजरा (ता.आजरा) येथे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत बोलत होते.

जमादार म्हणाले, आमदार आबिटकर यांनी राधानगरी, भुदरगड व आजरा या विस्तारीत मतदार संघाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्नक केला असून आजरा शहर व आजरा तालुक्यातील पश्चिम भागातील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली आहे. मात्र माजी आमदार के.पी.पाटील यांना आजरा जिल्हा परिषद मतदार संघात किती गावे व वाडया-वस्त्या आहेत हे सांगता येणार नाही याचे कारण म्हणजे गेल्या 10 वर्षात के.पी.पाटलांनी आपली आमदारकी मोठेपणा व राजकीय फायद्यासाठी वापरली. आमदारकीच्या 10 वर्षात ते राधानगरी मतदार संघात कधी फिरकले नसल्यामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय आहेत हे कधी कळालेच नाहीत. याउलट आमदार आबिटकर हे सर्वसामान्य जनतेत मिळसणारे आमदार असून त्यांनी आपल्या कामातून आपली स्वताची वेगळी ओळख मतदार संघात केली आहे. आजरा जि.प.मतदार संघातील गाव तेथे विकास काम पोहचवली असून ते सर्वसमान्य जनतेच्या सुख:दुखात सामील झाल्याने “ये आपनाच छोरा है” अशी भावना व्यक्त करत यावेळी पक्ष न पहाता माणूस पाहून आजरेकरांनी विकास काम करणाऱ्या आमदार आबिटकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे असे सांगितले.
आमदार आबिटकर म्हणाले, आजरा शहरासह आजऱ्याचा पश्चिम भाग गेल्या कित्येक वर्षापासून विकासापासून वंचित होता. याभागातील वाडया वस्त्यांवर चांगले पक्के रस्ते पोहचविण्याचे काम केले आहे. याठिकाणी राज्या शासनाच्यानगरविकास विभागाकडून डीपीआर बनवून भरीव असा निधी उपलब्ध करून देण्यास मी कटिबध्द आहे. आमदार झाल्यावर पहिल्या दिवसापासून माझा राधानगरी मतदारसंघ विकास कामांच्या बाबतीत जिल्ह्यात रोल मॉडेल करायचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे. पाणी योजनांसह मूलभूत विकास कामांचे भान ठेवून नियोजन केले आणि आजपर्यंत बेभान होवून फक्त कामे आणि कामेच केली. मतदार संघतील सर्वसामान्य जनता हे सर्व डोळ्यांनी पहात आहे. त्यामुळेच गावोगावी विकास कामांचा आढावा घेताना प्रचंड प्रतिसाद मिळून जनता माझ्या पाठीशी असल्याचे चित्र दिसत आहे. कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठबळवर माझी वाटचाल निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आजरा कारखाना संचालक जितेंद्र टोपले म्हणाले, 5 वर्षामध्ये गट-तट-पक्ष-पार्टी यापलीकडे जाऊन त्यांना राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगिण व समतोल विकासासाठी करण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे. त्यांना पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा निर्धार आजरा व परिसरातील स्वाभिमानी जनतेने व तरुणांनी घेतला असल्याचे प्रतिपदान यांनी केला.

नगरसेवक संभाजी पाटील म्हणाले, पाच वर्षांपूर्वी राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील जनतेने आमदार आबिटकर यांच्यावर विश्वास टाकला. टाकलेल्या विश्वासाला तडा जावू न देता त्यांनी देखील दाखविलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्याचा निश्चय करून पहिल्या दिवसापासून कामाला लागले. गेली 25 वर्षे विकासात मागे राहिलेल्या मतदारसंघात तो बॅकलॉग भरून काढायचे आव्हान त्यांच्या समोर होते. त्यांनी ते यशस्वीपणे पुर्ण केले असून तो बॅकलॉग त्यांनी भरून काढला आहे.

यावेळी अस्मिता जाधव, आबू ताकीलदार, आप्पा खेडेकर, आजरा कारखाना संचालक मलिक बुरूड, भाजपा नाथ देसाई, सुधिर परळकर, संजय सावंत, मारुती बिगरजे, आमानुल्ला आगलावे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र सावंत, दिलवार चाँद, बाळासोब आगव, जी.एम पाटील, नगरसेविका संजीवनी सावंत, शुभदा जोशी, अस्मिता जाधव, मंजूर मुजारवर, सिकंदर मुल्ला, युवराज पोवार, गवसे सरपंच अशोक गुरव, हरपवडे सरपंच गुरव मॅडम, देवर्डे सरपंच वंदना गुरव, अवंडी धनगरवाडा सरपंच बाबू ऐडगे, पारपोली संरपच लता गुरव, रणजित सरदेसाई, आरीफ खेडेकर, गौस मांनगावकर, रवी तळेवाडीकर, प्रकाश देसाई, मयुर देसाई, अभिजीत इंजल, धनाजी परीट, सरदार चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here