आपला हक्काचा आमदार म्हणून अरुण डोंगळे यांना पाठवुया- मेघा धनवडे

0
329

राशिवडे प्रतिनिधी :
तुमचा आमचा हाक्काचा आमदार म्हणून अरुण डोंगळे यांना विधानसभेत पाठवुया .असे आवाहन राधानगरी तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा मेघाराणी धनवडे यांनी केले.
पुंगाव ता.राधानगरी येथे राधानगरी विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार अरुण डोंगळे यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक सदाशिव धनवडे होते.
यावेळी गोकुळचे संचालक अपक्ष उमेदवार अरुण डोंगळे म्हणाले, मतदार संघातील विकासाची दुष्टी,तरुणांना महिलांनारोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी निवडणूक रिंगणात आहे. आपला हक्काच वाढप्या सर्व पक्षीय उमेदवार म्हणून तुमची साथ द्यावी असे आवाहन केले.
यावेळी विजय भांदीगरे यानी पुंगाव गावातून सर्वाथिक मताधिक्य देऊ असे सांगितले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदीगरे, माजी उपसभापती आनंदा धनवडे,जयवंत भांदीगरे, विजय तुरंबेकर,पांडुरंग धनवडे, ऐ.के.पाटील, गोपाळ सुतार, मारुती नारकर, शंकर तुरंबेकर,आदी विविध संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन श्रीकांत कुलकर्णी यांनी केले.दरम्यान डोंगळे यांनी आपल्या प्रचारार्थ चाफोडी, मोहडे, वाघवडे, कोदवडे, येळवडे आदी गावांचा प्रचार दौरा केला.या दौऱ्यात भोगावतीचे संचालक बी.आर.पाटील, विश्वनाथ पाटील, धिरज डोंगळे, माजी संचालक व्ही.डी.पाटील, पंचायत समिती सदस्य उत्तम पाटील,सदाशिव पाटीलनामदेव पाटील)(कोदवडे), वसंतराव पाटील(सिरसे),सातापा पाटील,विष्णू पाटील बाबुराव गुरव मोहडे, सरपंच विष्णूपंत एकशिंगे पोलीस पाटील दिनकर पाटील वाघवडे,विठ्ठल राबाडे,टि.एल.पाटील बाजीराव कुपले(येळवडे)आदी विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here