हजारों कार्यकर्त्याच्या उपस्थितीत राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

0
420
आजरा प्रतिनिधी: चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील होणार हे कोणी भविष्याने सांगण्याची गरज नाही. जनतेनेच राजेश पाटील यांना विजय करण्याचा विचार पक्का केला आहे. असे प्रतिपादन आम. हसन मुश्रीफ यांनी केले. 
     राष्ट्रवादी चे उमेदवार राजेश पाटील यांचा अर्ज आज हजारोंच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.श्री रवळनाथ मंदिरापासून मोर्चा ने कार्यकर्ते तहसिल कार्यालयात आले. यावेळी आम. मुश्रीफ उपस्थित होते.
    स्व. नरसिंग पाटील यांचे या मतदार संघासाठी मोठे योगदान आहे. हे जनतेला ज्ञात आहे. त्यांच्या उपकारांची परतफेड जनतेला या निवडणुकीतून करायची आहे. जनतेनेच आत्ता ठरवल्या मुळे राजेश पाटील निवडून येण्यात अडचण नाही. जे नाराज आहेत त्यांची नाराजी दुर करुन पाटील यांना मताधिक्य देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरु करावे असे आवाहन मुश्रीफ यांनी केले. या मतदार संघाचा विकास व्हायला हवा तर एकच पर्याय तो म्हणजे पाटील यांचा विजय आहे. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून व अफवांवर विश्वास न ठेवता जोमाने कामाला लागावे.
    मला संधी द्या तुमच्या संधीचे मी सोने नक्कीच करेन असे आश्वासन राजेश पाटील यांनी दिले. यावेळी आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here