युतीचे संकेत आहेत :एकनाथ खडसे

0
247

टीमन्यूजमराठी24 : विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आठवडा उलटत आला तरीही अद्याप युतीच्या चर्चेचे घोंगडे भिजत आहे. भाजप – शिवसेनेकडून दररोज नवनवीन फॉर्म्युलावर चर्चा होत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील युतीच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे राज्यातील नेत्यांचे डोळे दिल्लीकडे लागले आहेत. यामध्ये २०१४ साली युती तुटल्याची घोषणा करणारे भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील युती होण्याचे संकेत दिले आहेत.२०१४ साली जागांच्या देवाण-घेवाणीला वेळ लागत होता, अनेकवेळा चर्चा करूनही काही निर्णय होत नव्हता. त्यावेळी मी विरोधीपक्ष नेता होतो, त्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार मी युती तुटल्याची घोषणा केली होती, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. दरम्यान, वरिष्ठ पातळीवरील चर्चेतून मला जी माहिती आहे, त्यानुसार युतीचे संकेत आहेत. असंही खडसे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here