काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा..

0
86

औरंगाबाद : काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी काँग्रेसच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे.त्यामुळे काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. राजेंद्र दर्डा सलग 15 वर्ष आमदार राहिले आहेत, तसेच त्यांनी वेगवेगळी मंत्रिपदही भूषवली आहेत.राजेंद्र दर्डा ‘लोकमत’सारख्या मोठ्या दैनिकाचे मालक देखील आहेत. त्यांच्या या राजीनाम्यामुळे काँग्रेससमोरील समस्या आणखी वाढली आहे. वैयक्तिक अडचण असल्यामुळे आपण या कमिटीतून बाहेर पडत असल्याचं राजेंद्र दर्डा यांनी सांगितलं आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे राजेंद्र दर्डा यांनी राजीनामा सुपूर्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here