सावित्रीबाई फुले रुग्णालयात शीतशवपेटींची सुविधेस प्रारंभ !

0
172

कोल्हापूर ता.19 :- महापालिकेच्यावतीने सावित्रीबाईफुले रुग्णालयात आज पासून शीतशवपेटी उपलब्ध करुन देण्यात आली. आमदार सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील, महापौर सौ.माधवी गवंडी , उप-महापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या उपस्थित सावित्रीबाईफुले रुग्णालयात या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला.
शहरामध्ये एखादयाचा मृत्यु झाल्यास परगावातील पाहुण्याना येण्यास विलंब लांगलेस सदरचा मृतदेह शीतशवपेटींमध्ये ठेवावा लागतो. शहरामध्ये शीतशवपेटींची संख्या कमी असलेने मृतदेह ठेवणेस ब-याचशा अडचणी येत आहेत. या सर्वाचा विचार करुन स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर करताना शहरामध्ये चार ठिकाणी शीतशवपेटीं ठेवणेसाठी बजेटमध्ये 15 लाखाची तरतुद केलेली होती. ही शीतशवपेटी महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालय, पंचगंगा हॉस्पीटल व आयसोलेशन हॉस्पीटल येथे ठेवण्यात येणार आहे. आज यापैकी एक शीतशवपेटी सावित्रीबाई फुले हॉस्पीटल येथे आज पासून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक सचिन पाटील, संजय मोहिते, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, विनायक फाळके नगरसेविका सौ.प्रतिज्ञा पाटील, दिपा मगदूम, सौ.माधुरी लाड, सौ.प्रतिज्ञा उत्तूरे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, वैद्यकीय अधिकारी प्रकाश पावरा, आरोग्य विभागाडील कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here