गारगोटीच्या पांढरी जोतीबा मंदीरसाठी साठी 1 कोटी निधी हा माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण : आमदार प्रकाश आबिटकर

0
435

गारगोटी प्रतिनिधी :
पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पर्यटन व धार्मिक स्थाळांचे सुशोभिकरण करण्याकरीता निधी वितरीत केला जातो. या योजनेअंतर्गत गारगोटीच्या ग्रामदैवत असणाऱ्या जोतीबा मंदीराचे सुशोभिकरण करण्याकरीता 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आबिटकर आबिटकर व जि.प.कोल्हापूरचे माजी उपाध्यक्ष बी.एस.देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले, पर्यटन विकासाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्याचा आपण प्रयत्न करणार असून, राधानगरी विधानसभा मतदार संघ पर्यटनाचा मोठा खजिना आहे. गेली साडेचार वर्षे आपण या मतदार संघाचा पर्यटनदष्टया विकसीत करण्यासाठी कोटयावधीचा निधी उपलब्ध केला असून यामुळे पर्यटकांच्या संख्येत लक्षणीस वाढ झालेली आहे. यामुळे स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच गारगोटी गावचे ग्रामदैवत असणारे जोतीबा मंदीराचा विकास गेली अनेक वर्षापासून रखडलेला होता. जोतिबा देवाची फेब्रुवारी महिन्यात मोठी यात्रा भरते. यावेळी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. येणाऱ्या भावीकांना सोई-सुविधा उपलब्ध नव्हत्या. यानिधीमधून जोतिर्लिंग मंदीराचा चौक सुशोभिकरण, दर्शन मंडप, सार्वजनिक शौचालय व स्टॉल, प्रवेशव्दार व आवार भिंत तसेच बागबगीचा होणार आहे. तसेच मला सांगण्यास आनंद होतो की या परिसराचे सुशोभिकरण करण्याकरीता 85 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.यावेळी बोलताना जि.प.कोल्हापूरचे माजी उपाध्यक्ष बी.एस.देसाई म्हणाले, आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदार संघाचा पर्यटनदष्टया विकास होणेसाठी कोटयावधीचा निधी उपलब्ध केला आहे. त्यांच्या माध्यमातून किल्ले भुदरगड, किल्ले रांगणा, राऊतवाडी-दोनवडे धबधबा परीसर सुशोभिकरण, दाजीपूर अभयारण्य परिसर सुशोभिकरण करण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. या परिसरांचा विकास झालेमुळे पर्यटकांची रेलचेल या भागात वाढणार असून यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
यावेळी अंकुश चव्हाण बापू, बाजीराव चव्हाण, भाई आनंदराव आबिटकर, मंदीराचे मानकरी मधूकर चौगले, मारुती गुरव, तायाप्पा कांबळे, प्रल्हाद आबिटकर, सरपंच धनाजी खोत, सदाशिव खेगडे सर, भिमराव शिंदे, व्ही.जे.कदम सर, माजी उपसरपंच अरुण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मोरे, सुशांत सुर्यवंशी, रणधिर शिंदे, सदस्या अनिता गायकवाड, स्मिता चौगले, महेश सुतार, दिपक देसाई, दत्तात्रय चव्हाण (आण्णा), दत्तात्रय सोरटे, अल्ताफ बागवान, दिलीप देसाई, अजित चौगले, चिदंबर कलकुटकी, दशरथ कुपटे, सुभाष देसाई, विजय सारंग, दशरथ राऊत, पांडूरंग कांबळे, राजन आबिटकर, पांडूरंग सोरटे, संजय कळंबेकर, एस.के.कांबळे, आनंदा कांबळे यांच्यासह गारगोटी, सोनाळी, हणबरवाडी, शिंदेवाडी, देसाईवाडी येथील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here