पालकमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्यावतीने प्रधानमंत्री जनआरोग्य कार्डचे वितरण

0
165

कोल्हापूर :
पालकमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षाच्यामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू रुग्णासाठी विविध योजनेंच्या माध्यमातून उपचार केले जातात. आज कोल्हापूर जिल्ह्यातील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत निवड झालेल्या १००० लाभार्थ्यांना या गोल्डन कार्डचे वितरण भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव, भाजपा सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, दिलीप मेत्राणी यांच्या प्रमुख उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृह येथे करण्यात आले. यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी (आरोग्य) विकास देशमुख – मुंबई, आर.डी.पाटील, अॅड.संपतराव पवार, चंद्रकांत घाटगे, गणेश देसाई, नचिकेत भुर्के यांची उपस्थिती होती.
आज केशवराव भोसले नाट्यगृह येथे दुपारी ३ वाजता आयुष्यमान भारत योजनेतील १००० लाभार्थ्यांना मोफत गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर या वैद्यकीय कक्षामार्फत सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीस वैद्यकीय सहय्य आवश्यक वाटल्यास त्यांनी पालकमंत्री वैद्यकीय कक्षाशी तसेच mera.pmjay.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे ,प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here